मिलींद नाईकःतहसिलदार मोरेश्वर हाडके यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी
दोडामार्ग. ता.११: रेड झोन मधून येणार्या लोकांना थेट गावात प्रवेश देण्यात येवू नये, अशी मागणी आज दोडामार्ग शिवसेनेचे उपविभागप्रमुख मिलिंद नाईक यांनी तहसिलदार मोरेश्वर हाडके यांच्याकडे आज निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
दरम्यान बाहेरुन आणून ठेवण्यात येणार्या लोकांमुळे गावात भितीचे वातावरण आहे. त्यामुळे यातून संबधितांना मुक्त करण्यासाठी आवश्यक ती उपाय योजना करण्यात यावी,अशा आशयाचे निवेदन त्यांनी दिले आहे.त्या निवेदनावर तब्बल १८२ ग्रामस्थांच्या सह्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रुग्णांची संख्या वाढत असताना, अशा प्रकारची भूमिका घेणे योग्य नाही. प्रशासनाने याचा गार्भीयाने विचार करावा.असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.