सतिश सावंत यांची माहिती : पेटिएम सोबत आता फोन पे वरसुध्दा सुपरफास्ट सुविधा
सावंतवाडी, ता. ११ : बँकेच्या ग्राहकांना आर्थिक व्यवहार करणे सुलभ व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून आता फोन पे या पेमेंट अॅपवर सुध्दा सुविधा देण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून तात्काळ व्यवहार करणे शक्य होत आहे.
दरम्यान युपीआय लाईव्ह सेवा देणारी सिंधुदुर्ग जिल्हा ही राज्यातील पहीली बँक ठरली आहे असा दावा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी केला आहे. आता फोन पे पेेमेट, पेटिएम अॅपचा वापर ग्राहकांनी करावा असे आवाहन श्री. सावंत यांनी केले आहे. पेटीएमच्या माध्यमातूनही ग्राहकांना बॅंकेच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे असेही त्यांनी सांगितले.