महेश सारंग यांचा इशारा ; जिल्हा प्रशासन आणी जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी विरोधात नाराजी
सावंतवाडी.ता,११: एका पत्रकाराला अवैध धंदे व्यावसायिकाकडुन थेट घरात जावून धमकी दिली जाते. हा प्रकार योग्य नाही,याबाबत येत्या आठ दिवसात जिल्हा प्रशासनाने योग्य ती भूमिका न घेतल्यास, भाजपाच्या माध्यमातून आंदोलन उभारण्यात येईल,असा इशारा भाजपाचे नेते महेश सारंग यांनी आज येथे दिला आहे.
सातार्डा ता. सावंतवाडी येथे सिंधुदूर्ग न्यूज या चॅनलमध्ये काम करणार्या संजय पिळणकर या पत्रकाराला तेथिल एका व्यक्तीकडुन घरात जावून शिवीगाळ करण्यात आली होती. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.हा सर्व प्रकार बातमी प्रसिध्द केल्याच्या रागातून घडला होता.या प्रकरणी संबधित पत्रकाराने तक्रार दिली असून, अद्याप पर्यत याबाबत कोणतीही कठोर भूमिका पोलिसांनी घेतलेली नाही,असे श्री सारंग यांचे म्हणणे आहे.
दरम्यान बातमी छापल्याच्या रागातून अशा प्रकारे अवैध धंदे करण्याकडुन झालेल्या प्रकाराला जिल्हा पोलिस प्रशासन आणी जिल्ह्यातील सत्ताधारी नेते दुर्लक्ष करीत असतील,तर ते आम्ही कदापिही खपवून घेणार नाही,असा इशारा श्री सारंग यांनी दिला आहे.