खासदार नारायण राणेंच्या विकास निधीतून मंजूर टॉवरचे काम पूर्ण ; ग्रामस्थांतून समाधान…
मालवण, ता. ११ : खासदार नारायण राणे यांच्या स्थानिक विकास निधीमधून मंजूर झालेल्या सर्जेकोट बंदर जेटी येथील हायमास्ट टाॅवरचे काम पुर्ण झाले आहे. बंदर जेटी परिसर प्रकाशमय झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पंचायत समितीच्या माजी सभापती सोनाली कोदे यांनी खासदार नारायण राणे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधत हायमास्ट टॉवरची मागणी केली होती. तसेच सर्जेकोट ग्रामस्थांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार खासदार राणे यांनी स्थानिक विकास निधीतून हा हायमास्ट टॉवर मंजूर केला. या हायमास्ट टाॅवरचे काम अखेर पूर्ण करण्यात आले आहे. संपुर्ण बंदरावरील जेट्टी परीसर या हायमास्टमुळे प्रकाशमय झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.