कणकवली, ता.११ : सिंधुदुर्ग -रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या वतीने कणकवली शहरातील १०० हुन अधीक गरजू रिक्षा व्यावसायिकांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कणकवली विजय भवन येथे करण्यात आले.
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात सर्वत्र तिसरे लॉकडाऊन १७ मे पर्यंत करण्यात आले आहे. त्याची झळ आता तीव्र होऊ लागली असून अनेक व्यवसाय आज हि ठप्प असून यात रिक्षा व्यवसायिकांचेहि मोठे नुकसान झाले असल्याने शहरातील गरजू रिक्षा चालकांना मदत म्हणून गृहोपयोगी वस्तूंचे वाटप खा. विनायक राऊत यांच्या वतीने करण्यात आले. रिक्षा व्यवसायिकांची शिवसेनेने दखल घेतल्याबाबत समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,नगरसेवक सुशांत नाईक , कन्हैया पारकर, शहरप्रमुख शेखर राणे, अँड हर्षद गावडे, योगेश मुंज , सुनील पारकर, तेजस राणे,अरुण परब, रुपेश साळुंखे,बाळू वालावलकर, महेश राणे यांसह रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.