Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ९४६ व्यक्ती अलगीकरणात...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ९४६ व्यक्ती अलगीकरणात…

के.मंजुलक्ष्मी; पैकी ६३२ व्यक्ती गृह अलगीकरणात….

सिंधुदुर्गनगरी.ता.११ : जिल्ह्यात आज मितीस एकूण 946 व्यक्ती अलगीकरणात असून 632 व्यक्ती गृह अलगीकरणात तर 314 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 802 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 765 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत.त्यातील 4 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 761 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 37 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील 26 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 2591 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या 4 कोरोना बाधीत रुग्णांपैकी दोन रुग्णांवर विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. तर इतर दोन रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
बांदा तपासणी नाक्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
बांदा तपासणी नाका येथे तपासणीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी बांदा तपासणी नाका येथे भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी गोव्याचे प्रधान सचिव पुनित गोयल, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आर. मेनका, सिंधुदुर्गचे पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, उत्तर गोव्याचे पोलीस अधिक्षक उत्कृष्ट प्रसुन, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी बांदा तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी जलदगतीने होण्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच तपासणी जलदगतीने होण्यासाठी आणखी तपासणी काऊंटर उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या.
आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी 13 हजार 25 व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाच्या लिंकवर नोंद केली आहे. या सर्वांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्याबाबत त्या त्या जिल्हा प्रशासनास कळविण्यात आले आहे.
तसेच राज्याबाहेर जाण्यासाठी 17 हजार 130 व्यक्तींनी लिंकवर नोंदणी केली आहे. नोंद केलेल्यांची यादी संबंधित राज्यातील नोडल अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. तसेच परराज्यात जाणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या संबंधीत राज्याच्या लिकंवर जाऊन नोंदणी करून पास प्राप्त करुन घेण्याविषयी संबंधित राज्य शासनांनी कळविले आहे. त्या बाबतच्या लिंकची माहिती संबंधित राज्यांनी जिल्हा प्रशासनास कळविली आहे. तसेच ही माहिती पास मिळण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये एस.एम.एस.च्या माध्यमातून कळविण्यात आली आहे.
सिंधुदुर्गात येण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून 18 हजार 864 व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यापैकी रेड झोनमधील हॉटस्पॉट व कंटेन्मेंट झोन मधील व्यक्ती वगळून इतर क्षेत्रातील व्यक्तींची माहिती परवानगी देण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनास कळविले आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील 11 कॅम्पमध्ये एकूण 215 कामगार व बेघर व्यक्ती वास्तव्यास आहेत. या सर्वांच्या निवासासोबतच भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments