सिंधुदुर्ग.ता,११: जिल्ह्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे.संबधित रूग्ण देवगड येथील आहे. आता कोरोनाबाधीतांची जिल्हयातील संख्या पाच वर गेली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी माहीती कार्यालयाच्या माध्यमातून दिली आहे.
देवगड तालुक्यातील वाडा येथील ५१ वर्षीय महिला मुंबई-वाशी येथून आली होती,अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.ती दिनांक ५ मे रोजी आली होती.९ मे ला तिचा नमुना कोरोना तपासणी साठी पाठवला होता.आज सोमवारी तिचा कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाला.यात तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.या नव्या रुग्णामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या पाचवर गेली आहे.तर यातील पाच पैकी दोन रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त झाले आहेत.