तोंडवळी येथील घटना ; अन्य तिघांना वाचविण्यात यश…
मालवण, ता. ११ : तोंडवळी वरचीवाडी येथील खाडी पात्रात उतरलेला सन्मान संदीप गोलतकर (वय- २२) हा युवक बेपत्ता झाल्याची घटना संध्याकाळी घडली. अन्य तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे.
तोंडवळी वरचीवाडी येथील चार तरुण आज सायंकाळी तोंडवळी येथील खाडी पात्रात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने चारही जण बुडू लागले. चारजण पाण्यात बुडत असल्याचे दिसून येताच तेथे उपस्थित असलेल्या महेश पेडणेकर, भूषण गोलतकर यांनी होडीच्या सहाय्याने घटनास्थळी धाव घेतली यात तिघांना वाचविण्यात त्यांना यश आले तर सन्मान गोलतकर हा युवक बेपत्ता झाला आहे. त्याचा उशिरापर्यंत शोध सुरू होता.