संजू परब; माणूसकीचा धर्म म्हणून हॉटेल,लॉज व्यावसायिकांनी करावे सहकार्य….
सावंतवाडी ता.१२: कोरोनाच्या काळात सावंतवाडी शहरातीलचं लोकांना कॉरन्टाईन करण्यात येणार आहे,ग्रामीण भागातील लोकांना कोणत्याही परिस्थितीत या ठीकाणी ठेवले जाणार नाही,त्यामुळे याची दखल हॉटेल व्यावसायिकांनी घ्यावी,असे आवाहन सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केले.दरम्यान ग्रामीण भागात संबधित लोकांची सोय करण्यात आली आहे.त्यामुळे तेथे येणार्या लोकांनी सहकार्य करावे,असे आवाहन सुध्दा श्री.परब यांनी केले.आपण शहराचा नगराध्यक्ष आहे.त्यामुळे प्रथम शहराचे हीत जोपासणार आहे,असे त्यांनी सांगितले.
शहरात पेड कॉरन्टाईन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.या पार्श्वभूमिवर आज शहरातील हॉटेल व्यावसायिकांची बैठक आज पालिकेच्या सभागृहात घेण्यात आली.यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर,मुख्याधिकारी संतोष जिरगे,वैदयकीय अधिक्षक उत्तम पाटील,सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यादव आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना ही श्री.परब यांनी उपस्थित हॉटेल व लॉज व्यावसायिकांना आवाहन केले.माणूसकीचा धर्म पाळून ना नफा ना तोटा या धर्तीवर या ठीकाणी पेड कॉरन्टाईन होण्यासाठी येणार्या लोकांना सहकार्य करावे,या काळात हॉटेल व्यावसायिकांना आवश्यक असलेली मदत पालिका प्रशासन करणार आहे.
यावेळी वैदयकीय अधिक्षक उत्तम पाटील म्हणाले,आम्ही आरोग्याच्या दृष्टीने सतर्क आहोत.त्यामुळे जे कोणी येणार आहेत त्याची तपासणी करूनच त्यांना कॉरन्टाईन करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.त्यामुळे बाहेरून येणार्यांनी आरोग्य प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
यावेळी जगदिश मांजरेकर,बाळ बोर्डेकर,जितू पंडीत,डी के सावंत आदी उपस्थित होते.