संजू परब; शहरातील पाणीपुरवठयाला अडथळा,नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन…
सावंतवाडी ता.१२: शहरात आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पुरवठा करणारी पाळणेकोंड धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली आहे.दरम्यान शहराला उद्या पाणीपुरवठा होण्यास अडचणी निर्माण होणार आहेत.त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.
यावेळी ते म्हणाले, ही पाईपलाईन मोठ्या झाडाच्या मुळा खाली होती.दरम्यान वादळी वाऱ्याने झाड उन्मळून पडल्यामुळे पाईपलाईन फुटली आहे.त्या ठिकाणी कर्मचारी पाठविण्यात आले आहेत.मात्र नेमकी परिस्थिती काय आहे याचा अंदाज आताच बांधणे योग्य नाही,त्यामुळे नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी,असेही त्यांनी यावेळी सांगितले.