बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल; वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका…
: दशक्रोशीला आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. विलवडे वरची वाडी येथील ठाकर कुटुंबियांच्या घरावर वीज पडून विजेचा घरातील सहा जणांना जबर धक्का जाणवला. स्थानिकांनी सर्वांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
बांदा शहरात वादळी वाऱ्याने सर्वाधिक नुकसान केले. शहरातील देऊळवाडी येथील तुकाराम महादेव मोरजकर यांच्या घराच्या छपरावरील पत्र्याची शेड पूर्णपणे उडाल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. खेमराज हायस्कुल नजीक झाड उन्मळून पडले. ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीतील शेड देखील पूर्णपणे उडून गेल्याने नुकसान झाले.
बांदा पंचक्रोशीत ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्यात. वीज वाहक तारांवर झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.