पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विलास गावडे यांच्या पुढाकारातून उपक्रम…
वेंगुर्ले ,ता.१३:कोरोनाचे संकट असतानाच वेंगुर्ले शहरात सध्या पाणी टंचाईची समस्या सुरु झाली आहे. त्यावर मात करण्याच्या उद्देशाने “नाहि राजकारण फक्त समाजकारण” या विचाराने सिंधुदुर्ग जिल्हा व जिल्ह्याबाहेर सामाजिक, कला, क्रिडा, सांस्कृतीक,आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवाशक्ती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि विलास गावडे मित्रमंडळ यांच्यावतीने वेंगुर्ले शहरवासियांच्या मागणीवरुन शहर परीसरात “मोफत पाणी वाटप” हा सामाजिक उपक्रम रात्री पासून सुरु करण्यात आला.
वेंगुर्ला शहरात युवाशक्ती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे संस्थापक अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेचे संचालक तथा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कार्याध्यक्ष विलास गावडे यांच्या प्रमूख उपस्थितीत या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी वेंगुर्ला नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक प्रकाश डिचोलकर, नगरसेवक विधाता सावंत, नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे, नगरसेविका कु स्नेहल खोबरेकर, नगरसेविका सौ कृतिका कुबल, माजी नगरसेवक मनिष परब,अब्दुल शेख, प्रसाद देसाई, शुभम गावडे, शैलेश करंजेकर, तुषार भोसले, सखाराम परब, प्रशांत गावडे, जुबेर जंगुभाई, अल्ताफ शेख, नेहाल शेख आदीसह युवाशक्ती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि विलास गावडे मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना विलास गावडे म्हणाले की, युवाशक्ती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग मार्फत सातत्याने सर्व क्षेत्रात विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. आज शहर परीसरात उद्भलेल्या पाणी टंचाई समस्येवर उपाय म्हणून, आणि शहर वासियांची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून “मोफत पाणी वाटप” हा सामाजिक उपक्रम सुरु केला आहे. शहर परीसरात ज्या ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता असेल तेथे मोफत पाणी वाटप करण्यात येईल. त्याच प्रमाणे पाणी म्हणजे जिवन आहे त्याचा वापर प्रत्येकाने आवश्यकतेनूसार योग्य प्रमाणात करुन पाणी बचत करावी असा संदेश त्यांनी दिला. या मोफत पाणी वाटप उपक्रमाचे आयोजन शहरात झाल्यामूळे आणि पाण्याची गैरसोय दुर होणार असल्यामूळे शहरातील नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.