Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
बांदा पोलिसांची कारवाई ;7 लाख 84 हजाराचा मुद्देमाल जप्त…
बांदा,ता.१३:
बांदा पोलीसांनी तांबुळीत गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात केलेल्या दोन वेगवेगळया कारवायांमध्ये एकूण ३ लाख ८४ हजार रुपयांच्या दारुसह मिळून ७ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पहिल्या कारवाईत गोव्यातून तांबुळीच्या दिशेने जाणारी ओमनी कारची (एमएच ०८ सी १९४४) तपासणी केली असता त्यात १ लाख ५३ हजार ६०० रुपयांची दारु आढळून आली. सुमारे १ लाख रुपयांची ओमनी कारही ताब्यात घेण्यात आली. बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी नासिर राजगुरु (वय ४०, रा. सावंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या कारवाईत तांबुळीच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार (एमएच ४३ एबी ६५०१) तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारुसाठा आढळून आला. कारमध्ये २ लाख ३० हजार ४०० रुपयांची गोवा बनावटीची दारु सापडली. दारु वाहतुकीसाठी वापरलेली ३ लाख रुपयांची कारही ताब्यात घेण्यात आली. यात राजकुमार चव्हाण व हेमंत रंकाळे (दोघेही रा. सावंतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही कारवाया आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आल्या. सदर कारवाई बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रशांत पवार, मनिष शिंदे, महेश भोई व बाळकृष्ण गवस यांच्या पथकाने केली. लॉकडाऊन काळात चेकपोस्टवर पोलीस बंदोबस्त असतानाही गोव्यातून महाराष्ट्रात दारु वाहतुक झालीच कशी असा सवाल या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.