पुढील वर्षात प्रवेश देण्याच्या निर्णयाबद्दल कणकवली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून कृतज्ञता व्यक्त
वेंगुर्ला, ता.१३ : महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील उच्च तंत्र शिक्षण विभागातर्फे येणाऱ्या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षातील परीक्षा वगळून इतर सर्व वर्गातील परीक्षा न घेण्याचा निर्णय करोनाच्या पार्श्वभूमीवर घेऊन पुढील वर्षात प्रवेश दिला. याबद्दल सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेजच्या कणकवली अभियांत्रीकीच्या द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष विद्यार्थ्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन पुढील वर्षात प्रवेश देण्याच्या धाडसी निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तेरा कुलगुरूंच्या समितीकडून यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार अंतिम वर्षातील परीक्षा या घेण्याबाबत निश्चित केले. मात्र उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अंतिम परीक्षा वगळून त्याखालील सर्व परीक्षाचे मागील परीक्षातील विद्यार्थ्यांचे एकूण परफॉर्मन्स पाहून ग्रेड देण्याचे विद्यापीठामार्फत निश्चित केले आहे. अशा सर्व मुलांना पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार निश्चित केला आहे. या धाडसी निर्णयाबद्द्ल राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा असणारा प्रश्न हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शक तत्वानुसार सोडविण्यात आल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाबद्दल विद्यार्थ्यांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी कणकवली महाविद्यालयाच्या द्वितीय व तृतीय वर्षातील नेहा डुबळे व चिन्मय डुबळे या दोन विद्यार्थ्यांनी भेट वस्तू मत्री उदय सामंत याना देऊन त्याचे आभार मानले आहेत. त्यामुळे अंतिम वर्ष वगळून इतर वर्षातील विद्यार्थ्यांच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करुन कृतज्ञता या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.