आरोग्य, पोलिस कर्मचा-यांसह चाकरमानी जखमी : परिसरात असलेल्या सगळ्यांची तारांबळ
कणकवली, ता. 13 : खारेपाटण चेकनाक्या पासून काही अंतरावरील झाडावरील मधमाश्यांनी तेथील कर्मचारी आणि चाकरमानी यांच्यावर हल्ला चढवला. यात अनेकजण जखमी झाले. सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली.
आज मुंबई वरून येणाऱ्या चाकरमान्यांच्या गाडीची वैद्यकीय तपासणी सुरू होती. यावेळी रस्त्यावर सुमारे २००-३०० गाड्या उभ्या होत्या. तपासणीसाठी वेळ लागत असल्याने काही चाकरमानी त्या चेकपोस्ट जवळ असणाऱ्या नदीवर पाणी आणण्यासाठी गेले असता तेथे झाडावर असलेले एक मधमाश्यांचे पोळे अचानक उठले आणि त्यांनी तेथे असणाऱ्या सर्व चाकरमान्यावर तसेच तपासणी नाक्यावर असणाऱ्या आरोग्य कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी आदी वर जोरदार हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने सगळ्यांचीच तारांबळ उडाली होती.