प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार; ७ जण पडले बेशुद्ध…
कणकवली, ता.१३: खारेपाटण येथील मधमाशांच्या हल्ल्यात २४ जण जखमी झाले होते. तर ७ जण बेशुद्ध पडले होते. या सर्वांना खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.अवजड वाहनांच्या हादर्याने खारेपाटण पुलाचा भाग हल्ल्याने मधमाशांचे पोळे उठले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
आज सकाळी अकराच्या सुमारास खारेपाटण नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या खाली असलेले मधमाशांचे पोळे हल्ल्यानंतर मधमाशांनी खारेपाटण चेकपोस्टवर आलेल्या चाकरमान्यांवर हल्ला केला होता. यानंतर त्या परिसरात मोठी धावपळ झाली होती. पोलिस आणि स्थानिकांनी जाळ करून मधमाशांना हाकलून लावले होते. मात्र या दरम्यान मधमाशांच्या डंखाने ७ व्यक्ती बेशुद्ध पडल्या होत्या. तर एकूण २४ जण जखमी झाले होते. मधमाशांचा हल्ला होत असताना अनेक चाकरमान्यांनी नदी डुबकीही घेतली. मात्र तरीही त्यांच्यावर मधमाशांनी चावा घेतला होता.
मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये सचिन देसाई (वय 42), श्यामल देसाई (39), श्रेया देसाई (वय 7 सर्व रा.पनवेल), दीपक भिंगारे (वय 39), सीमा भिंगारे (वय 35), आर्या भिंगारे (वय 8), शीतल भिंगारे (वय 4), विद्या लाड (वय 49), नारायण देशमुख (वय 42), जितेश माळकर (वय 25), मानसी घाडीगावकर (वय 10), योगिता घाडीगावकर (वय 3), मैत्री घाडीगावकर (वय 5), प्रवीण घाडीगावकर (वय 34), प्रिया घाडीगावकर (वय 32), ईश्वरी घाडीगावकर (वय 2), अरुण गुरव (वय 30), दत्तात्रय गुरव (वय 42), सागर कांडर (वय 30), सारिका कांडर (वय 26), विघ्नेश लाड (वय 21), तुषार लाड (वय 23) यांचा समावेश आहे.