नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; गावातील आरोग्य यंत्रणेबाबत व्यक्त केली नाराजी…
कणकवली ता.१३: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांना गावातील शासकीय इमारतीमध्ये क्वारंटाईम केले जात आहे,मात्र त्याठिकाणी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अशा इमारतीमध्ये पाणी,वीज,शौचालय आदी सुविधां तातडीने देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला शासनाने विशेष निधी मंजूर करून द्यावा,अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्त्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.दरम्यान ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सद्यस्थितीत सक्षम नसून प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर,नर्सेस,आरोग्य सेवक उपलब्ध नाहीत,त्यामुळे भविष्यात या ठिकाणी कोरोना विरुद्ध लढा देणे सुद्धा चिंतेची बाब बनली आहे.याकडेही शासनाने लक्ष घालावे,असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.याबाबत त्यांनी निवेदन दिले.