कामगार सेनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी योगेश दळवी यांची निवड…

2

कुडाळ,ता.०४: हिंद भारतीय कामगार सेनेच्या जिल्हा चिटणीस पदी युवा नेते योगेश दळवी यांची निवड करण्यात आली आहे. आज याबाबतचे नियुक्तीपत्र कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश पराडकर यांनी दळवी यांना दिले आहे.
श्री.दळवी हे माजी महापौर दत्ताजी दळवी यांचे चिरंजीव आहेत. गेली अनेक वर्षे त्यांचा युवा सेनेच्या माध्यमातून दांडगा लोकसंपर्क आहे. तसेच त्यांच्याकडे युवकांची मोठी फळी आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

11

4