गुळदुवे येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू…

518
2
Google search engine
Google search engine
Google search engine

काल सायंकाळची घटना; आज सकाळी आढळला मृतदेह…

सावंतवाडी.ता.१३:  गुळदुवे येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी तेथीलच एका नदीपात्रात आढळून आला.ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली होती.कमलाकर वसंत जोशी(५०),असे त्यांचे नाव आहे.दरम्यान याबाबतची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला,व शवविच्छेदनासाठी मृतदेह मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,मयत जोशी हे नारळ गोळा करण्यासाठी आपल्या बागेत गेले होते.दरम्यान नजीक असलेल्या नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते पाणी त्यांच्या बागेत शिरले, व त्या पाण्यासोबत जोशी हे वाहून गेले.दरम्यान काल सायंकाळपासून त्यांचे शोध कार्य सुरू होते.मात्र उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नव्हता.दरम्यान आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केल्यानंतर त्यांचा मृतदेह घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर नदीच्या पाण्यात आढळून आला.

\