चतुर्थी पूर्वी कणकवली कोरोनामुक्त करणार

300
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पंचायत समितीचा निर्धार : तालुक्यात ६७  रुग्ण कोरोनामुक्त

कणकवली, ता.१३ : तालुक्यात 105 पैकी 67 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 38 रुग्ण लवकरच बरे होऊन घरी जातील आणि चतुर्थी पूर्वी कणकवली तालुका कोरोनामुक्त करू असा निर्धार कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी आज व्यक्त केला.
येथील पंचायत समिती सभागृहात श्री तळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पोळ, गटविकास अधिकारी मनोज भोसले, सूर्यकांत वारंग आदी उपस्थित होते.
श्री.तळेकर म्हणाले, कणकवलीत आम्ही जास्तीत जास्त रुग्ण तपासणी केले. कोरोना
रूग्णाच्या संपर्कातील निकटच्या आणि अतिनिकटच्या व्यक्तींना शोधून त्यांचे स्वब नमुने घेतले. घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी यांनी सर्वेक्षण केले. त्यामुळे कणकवली तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात आली आहे.
आतापर्यंत कोरोना मुक्तीसाठी जशी महसूल, आरोग्य, पोलिस व इतर विभागांनी मेहनत घेतली, तशीच यंत्रणा चतुर्थी कालावधीत राबवली जाणार आहे. तळेरे, कणकवली, खारेपाटण आदी बाजारपेठ येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे श्री.तळेकर म्हणाले.

\