आयत्यावेळी दोन फुटांच्या गणेश मूर्ती आणायच्या कोठून..?

389
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सुरेश गावडेंचा सवाल; जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदारांच्या वेगवेगळ्या सूचना.

बांदा ता.१३
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घरगुती गणेश मूर्तींसाठी दोन फुटांची मर्यादा घातली आहे. शासनाने तशा प्रकारची नियमावली जाहीर करून त्याची अंमलबजावणीची जबाबदारी जरी पोलिस, महसूल व स्थानिक प्रशासनावर दिली असली तरी जिल्हाधिकारी, पालकमंत्री व खासदार वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना देत असल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यात सद्यस्थितीत ऐनवेळी दोन फूट उंचीच्या मूर्ती कुठून मिळणार असा सवाल, रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी केला आहे.
राज्य सरकारने गणेशोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये स्थानिक प्रशासनाला नियोजनाचे अधिकार दिले आहेत. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावात स्थानिक प्रशासनाच्या समित्या असून देखील नियोजनासंदर्भात कुणीही विश्वासात घेत नसल्याचे सुरेश गावडे यांनी सांगितले. एकीकडे राज्य सरकार स्थानिक प्रशासनास प्राधान्य देते तर दुसरीकडे जिल्ह्यास्तरावर गावातील कोरोनापार्श्वभूमीवरील समित्यांचा विचार घेतला जात नाही. त्यामुळे जर स्थानिक समित्यांना विचारात घ्यायचे नसेल तर त्या समित्या प्रशासनाने बरखास्त करून काय असेल तो निर्णय घ्यावा समित्यांना गृहीत धरू नये, असे आवाहन सुरेश गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे ग्रामपंचायत प्रशासनास विचारात घेऊन कार्य करत आहेत. कारण गावपातळीवर कोणत्या प्रकारचे नियम किंवा गरज आहे याची जाणीव स्थानिक प्रशासनास असते. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार व आमदारांना गावातील प्रशासनाची आवश्यकता भासत नसेल तर विचार करण्यासाठी गोष्ट असल्याचे सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, सात दिवस गृह विलगीकरण आम्हांला मान्य नाही. शासनाच्या निर्देशानुसार गावात येणार्‍या चाकरमान्यांनी स्थानिक समितीच्या अटी शर्थी मान्य करणे गरजेचे आहे. या नियोजनात स्थानिक समितीच्या निर्णयात कोणीही हस्तक्षेप करू नये. समितीला स्थानिक अडचणी काय येतात व त्यावर काय करावे याची परिपूर्ण माहीती असल्याने त्यांना नियोजनात सहभागी करुन घेणे आवश्यक आहे. अन्यथा उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही गावडे यांनी दिला आहे.

\