उदय सामंत; विद्यापीठ आणि दारू दुकानाची तुलना करणे अशोभनीय…
मुबंई,ता.१३: सध्यस्थिती लक्षात घेता महाविद्यालयाच्या इमारती ही कोविड सेंटर झाली आहेत.अनेक ठिकाणी क्वारंटाइन सेंटर करण्यात आली आहेत.अशा धोकादायक परिस्थितीत त्या ठीकाणी परीक्षा घेणे अशक्य आहे.तशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे अशक्य असल्यामुळे सरासरी ग्रेडनुसार विद्यार्थ्यांना पदवी द्यावी.तसेच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे.त्यांची कोरोना गेल्यावर परीक्षा घेऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठ आणि दारूची दुकाने यांची तुलना करणे योग्य नाही. अशाप्रकारे कोणी टीका करत असेल तर ते अशोभनीय आहे, असेही ते म्हणाले.