वैभव नाईकांच्या सुचनेनंतर पालिका प्रशासनाचा निर्णय, मास्क व सोशल डिस्टन्स महत्त्वाचे….
मालवण,ता.१३: कोरोना पार्श्वभूमीवर २२ मार्च पासून ११४ दिवस बंद असलेले मालवणचे मच्छीमार्केट १७ जुलै पासून खुले करण्यात येणार आहे.आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनंतर पालिका प्रशासनाने मच्छिमार्केट खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, मत्स्यविक्रेत्या महिलांनी सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करावे. मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. तसेच ग्राहकांनीही सुरक्षित अंतर ठेवावे. अश्या सूचना मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी मत्स्यविक्रेत्यांना केल्या. मच्छीमार्केट बंद असल्याने मत्स्यविक्रेत्या महिला बाहेर बसून मासे विक्री करत होत्या. गेले महिनाभर भर पावसात या महिला मासे विक्री करत होत्या. बंद मार्केट खुले व्हावे, अशी मागणी विक्रेत्यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक व पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आमदार नाईक यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या सोबत बैठक घेतली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी, पंकज सादये, संमेश परब, तपस्वी मयेकर, नरेश हुले यासह मत्स्य विक्रेत्या महिला संघ अध्यक्षा सौ. मनीषा जाधव व मत्स्य विक्रेते महिला उपस्थित होते.
सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन, मास्कचे बंधन कोरोना पार्श्वभूमीवर अन्य खबरदारीच्या उपाययोजनांचे योग्य पालन होणार असेल तर मच्छीमार्केट खुले केले जाईल. दोन दिवसात बंद मार्केट स्वच्छ करून खुले केले जाईल. असे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले.