दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात मोफत स्वॅब टेस्ट करा…

153
2
Google search engine
Google search engine
Google search engine

भाजपाची मागणी ; संतोष नानचेंसह पदाधिकार्‍यांचे तहसीलदारांना निवेदन….

दोडामार्ग.ता,१३: येथील ग्रामीण रुग्णालयात मोफत स्वॅब टेस्ट उपलब्ध करून द्या,अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष नानचे यांनी दोडामार्ग तहसीलदार यांच्याकडे केली आहे.याबाबत त्यांनी पदाधिका-यांसह आज तहसीलदार मोरेश्वर हाडके यांची भेट घेऊन निवेदन दिले.यात त्यांनी असे म्हटले आहे की,गणेश चतुर्थी जवळ येत आहे.त्यामुळे गोवा राज्यातून तसेच अन्य ठिकाणावरून दोडामार्ग मध्ये येणाऱ्या व तिथून जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने आवश्यक असलेली कोरोना टेस्टची सोय करून देण्यात यावी, जेणेकरून त्याचा फायदा लोकांना होणार आहे.तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात यावी,असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सुधीर दळवी, रमेश दळवी,आदिती मणेरीकर,प्रकाश कोरगावकर, श्यामसुंदर चोर्लेकर, भरत गवत, महादेव बोर्डेकर, नवनाथ आयनोडकर, गोविंद टेमकर, कृष्णा डिचोलकर, शंकर देसाई, मिलिंद नाईक,आनंद तळणकर,संतोष हडीकर, उपस्थित होते.

\