Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याहायवे ठेकेदारावर गुन्हा दाखल करा...

हायवे ठेकेदारावर गुन्हा दाखल करा…

संदेश पारकर, सतीश सावंत यांची मागणी ; आमदार राणेंची निव्वळ स्टंटबाजी….

कणकवली.ता,१३: शहरात हायवेचे निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारावर तसेच हायवे अभियंता आणि कामावर देखरेख ठेवणार्‍या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर आणि जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज केली. तर भिंत कोसळल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी प्रांताधिकार्‍यांसमोर केलेली स्टंटबाजी केवळ अर्थपूर्ण व्यवहारासाठी होती असाही आरोप केला.
येथील विजयभवन येथे सतीश सावंत, संदेश पारकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू राठोड आदी उपस्थित होते.
कणकवली शहरातील बॉक्सवेलचे काम निकृष्ट झाले आहे. त्यामुळे बॉक्सेल आणि त्यासोबतची भिंत काढून जानवली नदीपर्यंत उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करावे अशी केंद्र शासनाकडे करावी याबाबत खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा झाली आहे. तर श्री.राऊत यांनीही त्याबाबतचा पत्रव्यवहार केंद्राकडे केला असल्याचे श्री.पारकर म्हणाले.
भिंत कोसळल्याच्या घटनेनंतर आमदार नीतेश राणे यांनी तेथे जाऊन निव्वळ स्टंटबाजी केली. तसेच प्रांताधिकार्‍यांसमोर असभ्य भाषा देखील वापरली. आमदारांची आजची स्टंटबाजी अर्थपूर्ण व्यवहारासाठी होती. वर्षभरापूर्वी आंदोलन केले त्यानंतर ते गप्प का बसले? ते सध्या भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्रातील भाजप सरकारकडून याबाबत चौकशी लावायला हवी होती. दिलीप बिल्डकॉन कंपनी ही केंद्र सरकारचा जावई आहे का, महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी झाली पाहिजे. यात मोठा भ्रष्टाचार आहे असा आरोप संदेश पारकर, सतीश सावंत यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments