पडवेतील लाईफ टाईम हॉस्पिटलच्या स्वॅब टेस्टींग मशिनचा उदया शुभारंभ…

678
2
Google search engine
Google search engine

मेडिकल कौन्सिलची मान्यता;कोरोना संदर्भातील रिपोर्ट होणार उपलब्ध

कणकवली.ता,१३:पडवे येथील मल्टीस्पेशालिटी एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटल अॅण्ड मेडीकल कॉलेजच्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या स्वॅब तपासणीची सुविधा निर्माण झाली आहे.या मशिनचा शुभारंभ मंगळवारी १४ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता पडवे येथे व्हास्पिटलच्या सुसज्ज प्रयोगशाळेत होणार आहे.
या ट्रनाईट स्वॅब टेस्टींग मुळे कोकणातील जनतेला फार मोठा फायदा होणार आहे.ज्यांना स्वतःच्या खात्रीसाठी,संशय दूर करण्यासाठी किंवा सरकारी निकषावर कोरोना संसर्ग नसल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी रिपोर्टर मिळणार आहेत.गोवा राज्यात जाण्यासाठी कोरोना स्वॅब टेस्टींग रिपोर्ट सक्तीचा केलेला आहे.जे युवक गोव्यात नोकरी साठी जातात त्यांनाही याचा फायदा होणार आहे. हे मशीन इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च ने मान्यता प्राप्त असल्याने शासकीय कामालाही हे रिपोर्ट चालणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्हयात या निमित्ताने हक्काची कोरोना टेस्ट लॅब जनतेला प्राप्त झाली आहे.