राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदार यांना निवेदन
वैभववाडी.ता,१४: केंद्रीय मंत्रालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे .मात्र कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. परीक्षा घेतल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. केंद्र शासनाने अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचा निर्णय चुकीचा आहे. राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत. याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने वैभववाडी तहसीलदारांना निवेदन दिले आले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षण विभागातील अंतिम वर्षांच्या परीक्षा सोडून अन्य सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र केंद्रीय मंत्रालयाने अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. याविरोधात फार्मसी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. या राज्यव्यापी आंदोलनाला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वैभववाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी हितासाठी जाहीर पाठिंबा केंद्र शासनाचा निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
सध्या वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाची परीक्षा घेऊ नये. याबाबत विद्यार्थ्यांचे निवेदन आपण वरिष्ठ पातळीवर कळविण्यासाठी सदरचे निवेदन विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने विचार व्हावा असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी कॉग्रेसचे वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मोईन हवालदार, अनिकेत रावराणे, अक्षय डोंगरे, भूषण कदम आदी उपस्थित होते.