Friday, December 5, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यारेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे होणार कोरोना लसीचे संशोधन..

रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे होणार कोरोना लसीचे संशोधन..

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिल्या शुभेच्छा….

मालवण.ता,१४: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार ठोस अशी पावले उचलीत असतानाच केंद्र सरकारच्या आय. सी.एम.आर या संशोधन संस्थेने कोरोना लस संशोधनासाठी भारतातील ज्या सर्वोकृष्ट बारा हॉस्पिटलची निवड केली आहे.त्यात गोवा धारगळ येथील डॉ.सागर विवेक रेडकर संचलित रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे डॉ. सागर रेडकर हे सिंधुदुर्गातील मालवण, रेडी गाव येथील डॉ.विवेक रेडकर यांचे सुपूत्र असून डॉ.विवेक रेडकर आणि डॉ.सागर रेडकर या पिता-पुत्रांनी इटली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चेस्ट कॉन्फरन्स मध्ये कोरोना उपचाराबाबत जगात चालणाऱ्या संशोधनाचा आढावा घेतला होता.त्यामुळे त्यांचा हा संशोधन प्रबंध व्हरच्युअल कॉन्फरन्स द्वारा निवड झाला होता.त्यामुळे कोरोना लस संशोधनासाठी या हॉस्पिटलच्या झालेल्या निवडीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.केंद्रीय आयुष मंत्री श्री. डॉ. श्रीपाद नाईक यांनी काल गोवा धारगळ येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरला अचानक भेट देत पाहणी केली आणि केंद्रीय मंत्री डॉ. नाईक यांनी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर धारगळची कोरोना लस संशोधनासाठी आयसीएमआर या संस्थेने तसेच केंद्र सरकारने निवड केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. डॉ. सागर रेडकर, डॉ धनंजय लाड व त्यांच्या संशोधन टिमला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
आज याबाबतचे वृत्त आज सकाळी राज्यात विशेषतः सिंधुदुर्गाबरोबरच गोव्यात पसरताच डॉ.रेडकर पिता-पुत्रांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.गोवा धारगळ येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरची झालेली ही निवड गोवा आणि कोकणवासियांसाठी गौरवाची गोष्ट आहे.डॉ. विवेक रेडकर आणि डॉ. सागर रेडकर या द्वयीनी इटली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चेस्ट कॉन्फरन्स मध्ये करोना ट्रीटमेंट बाबत जगात चालणाऱ्या संशोधनाचा आढावा घेतला. त्यांचा हा संशोधन प्रबंध व्हरच्युअल कॉन्फरन्स द्वारा सिलेक्ट झाला होता. कोरोना आजारावर कोकण व गोवा विभागातून सिलेक्ट झालेला हा पहिला संशोधन प्रबध होता. गेल्या ३ वर्षात रेडकर हॉस्पिटलतर्फे डॉ. सागर रेडकर, डॉ. सुप्रिया रेडकर व डॉ. विवेक रेडकर ह्यांनी जर्मनी,अमेरिका, दुबई, न्युझिलड येथे होणाऱ्या अमेरीकन डायबेटीकअसो, युरोपियन कार्डीअंक असोसिएशन अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉन्फरन्सीस मध्ये आपले संशोधन प्रबंध सादर केले. त्यांच्या हया संशोधनामुळे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया हॉस्पिटलला पुन्हा एकदा मान्यता मिळाली असुन, त्यांची इथिकल कमिटी मध्ये देखील नामांकित डॉक्टर्स व सशोधक कार्यरत असल्याची माहिती रेडकर हॉस्पिटलचे प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रविण सावंत दिली आहे.
दरम्यान भारत सरकारच्या कोरोना लस संशोधनामध्ये गोपनियता असल्यामुळे लसी संबंधीच्या सर्व बातम्या हया सरकारच्या आय. सी.एम.आर.साईट वरुन देण्यात येणार असल्याने डॉ. सागर रेडकर ह्यांनी त्यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments