मनसेची मागणी; सावंतवाडीत विजेच्या प्रश्नांसंदर्भात विद्युत वितरणला घेराव…
सावंतवाडी ता.१४: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विज बिल रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई देण्यात यावे,अशी मागणी आज येथे मनसेच्या वतीने करण्यात आली.दरम्यान घरगुती वीज बिलांवरील स्थिर आकार रद्द करण्यात यावा,तसेच गणेशोत्सव काळात ग्राहकांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यात यावा,अशा सूचनाही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.याबाबत विद्युत वितरणला घेराव घालण्यात आला.यावेळी विजेच्या विविध प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.
गेल्या तीन महिन्यात विज बिल रिडींग न घेतल्यामुळे ग्राहकांना सरसकट बिले काढण्यात आली आहेत.त्यामुळे सर्वसामान्यांना याचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या काळात नियमित वीज बिल रिडींग घ्या,अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.दरम्यान विज बिल रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याला पीपीई कीटची सुविधा द्यावी,तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अन्य विद्युत कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक ती किट पुरविण्यात यावी,अशीही मागणी यावेळी करण्यात आली.तसेच गणेशोत्सव काळात विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे,त्यासाठी कर्मचाऱ्यांना या काळात सतर्क राहून सेवा देण्याच्या सूचना द्याव्यात,असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार,राजू कासकर,संतोष भैरवकर,शुभम सवांत,ओंमकर कुडतरकर,सुधीर राऊळ आदी उपस्थित होते.