सावंतवाडी मनसेची मागणीःपालिका मुख्याधिकार्यांचे वेधले लक्ष…
सावंतवाडी ता.१४: येथील पालिकेच्या इमारतीलाचं लागून असलेले स्वच्छतागृह तेथील व्यापाऱ्यांसाठी दुर्गंधी ठरत आहे.गेले अनेक दिवस या ठिकाणी स्वच्छता नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान याबाबत आज मनसेच्या वतीने मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना जाब विचारण्यात आला.यावेळी त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा अन्यथा ते स्वच्छतागृह बंद करा,अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार,राजू कासकर,संतोष भैरवकर,शुभम सवांत,ओंमकर कुडतरकर,सुधीर राऊळ आदी उपस्थित होते.
शहरातील काही स्वच्छतागृहांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सफाई केली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.दरम्यान पालिकेच्या इमारतीला लागूनच असलेल्या स्वच्छतागृहात सफाई नसल्यामुळे त्या ठिकाणच्या व्यवसायिकांना नाक मुठीत धरून राहावे लागत आहे.तर परिसरात सुद्धा दुर्गंधी पसरली आहे.तसेच नजीकच हॉटेल व्यवसायिक असल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर सुद्धा याचा परिणाम होत आहे.त्यामुळे एक तर त्या ठिकाणी स्वच्छता करा,अन्यथा ते स्वच्छतागृह बंद करा,अशी मागणी यावेळी करण्यात आली.