संदेश पारकर; वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव, रक्तदान शिबिरातून जोपासले सामाजिक भान…
कणकवली,ता.१४: माझ्या राजकीय, सामाजिक वाटचालीत संकटातून मिळणार आनंद खूप वेगळा आहे.अनेक चढ-उतार बघितले आहेत. मात्र,तुमच्या सारख्या कार्यकर्त्यामुळे लढण्यासाठी उर्जा मिळते.सामाजिक बांधिलकीमुळेच जनतेची नाळ तुटली नाही,असा विश्वास कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला.
कणकवली कॉलेज एचपीसीएल सभागृहात रक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, बँक अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अतुल रावराणे,नीलम पालव,प्रफुल्ल सुद्रीक,अतुल बंगे,नगरसेवक सुशांत नाईक,दादा कुडतरकर,रुपेश नार्वेकर,भास्कर राणे,नीलम पालव,अभिनंदन मालडकर,कन्हैया पारकर,अवधूत मालवणकर,प्रा.दिवाकर मुरकर,राजू शेट्ये,तालुकाप्रमुख शैलेश भोगले,पूर्वा सावंत,वैद्यही गुडेकर,तेजल लिग्रज, साक्षी आम डोस्कर,उत्कर्षा धुमाळे ,संजना कोलते आदी उपस्थित होते.
संदेश पारकर म्हणाले,अनेक आंदोलनातून विकास कामांना गती देण्याचं काम केलं,मी मोठा मंत्री झालो तरी ही संदेश पारकर म्हणूनच कार्यरत राहीन. सेनेत प्रवेश केला नंतर जे प्रेम मिळाल त्याला तोड नाही ,सेनेत प्रवेश केल्याने युवा वर्गात आनंद मिळाला.अन्याय विकास,महिला सक्षमीकरण,रोजगार,पर्यटन आधी विषयासाठी पाठ पुरावा करून ती मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आहे. हे प्रेम आशीर्वाद सदैव ठेवा, तुम्ही हीच माझी संपती आहे. सेनेचे नेते निर्णयात आपल्याला सहभागी करून घेतात. आमदार वैभव नाईक म्हणाले, संदेश पारकर यांचा वाढदिवस साजरा करण्याचा योग्य आहे. त्यांना राजकीय भवितव्य उज्वल आहे,मंत्री महोदयांनी शुभेच्छा दिल्यात,यापुढे ही अधिक जोमाने काम करावं,नक्कीच भविष्य उज्वल आहे. सतीश सावंत म्हणाले,
संदेश पारकर यांच्यात मोठी ताकद,युवा नेतृत्व म्हणून पाहतो. निवडणुकीत ही प्रत्येक गावात जाऊन जोरदार प्रचार केला. कोणतेही काम झाल्याशिवाय ते सोडायच नाही ही सवय त्याच्याकडून शिकण्यासारखी आहे. देवळसाठी शेड,बंधारा यासाठी पाठपुरावा ते करत आहेत. संजय पडते म्हणाले, पारकरांचा प्रवास हा संघर्षमय जीवनातून झाला.३० ते ३५ वर्षापर्यंत त्याच्या वाट्याला संघर्षच पहावा लागला,नागरिकांमध्ये त्याप्रती असलेले प्रेम हे वाखळण्या जोगे आहे.राणेंचा विरोधक म्हणून इमेज वेगळी ताकद होती.काँग्रेस मध्ये जावून आश्वासन दिली, मात्र पूर्तता झाली नाही, ही शोकांतिका आहे.
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले,संदेश पारकर यांची सामाजिक बांधिलकी कायम आहे.
या कार्यक्रमात अतुल रावराणे,नीलम पालव यांच्यासह पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला.कोविड साथ असताना सोशल डिस्टन्स पाळून हे शिबिर पार पडले.