संदेश पारकर हे लढणारे आणि नडणारे नेतृत्व….

165
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभव नाईक ; दिडशेहुन अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान…

जनतेवर होणार्‍या अन्यायाविरोधात लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संदेश पारकर हे नेहमीच अग्रेसर असतात. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना विनाकारण कोणी त्रास देत असेल तर त्याच्याविरुद्ध नडतात म्हणूनचे ते लढणारे आणि नडणारे नेतृत्व आहे. तसेच शिवसेनेत त्यांना राजकीय भवितव्य असून यापुढील काळात पक्षवाढीसाठी जोमाने काम करावे. त्यामुळे भविष्यात तुमच्याकडे पदे चालून येतील, असे प्रतिपादन कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी केले.
शिवसेनेचे युवा नेते तथा कोकण विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथील एचपीसीएलच्या सभागृहात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय पडते, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, शैलेश भोगले, अतुल बगे, अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, सुुजित जाधव, नीलम सावंत-पालव, दादा कुडतरकर, भास्कर राणे, प्रा. दिवाकर मुरकर, प्रफुल्ल सुद्रिक, अवधूत मालवणकर, कन्हैया पारकर, राजू राठोड, वैद्यही गुडकेर, पूर्वा सावंत, साक्षी आमडोस्कर, तेजल लिग्रज, रोहिणी पिळणकर, वैजू कांबळे, संजना कोलते, उत्कर्षा धुमाळे आदी उपस्थित होते.
अमित सामंत म्हणाले, सामाजिक बांधिलकीमुळे संदेश पारकर हे नेतृत्व उदयास आले. राजकीय क्षेत्रात काम करताना त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी अद्यापही सोडलेली नाही. संदेश पारकर हे जनतेच्या सुख व दुःखात सहभागी होत असतात. त्यामुळे जनतेसोबत त्यांचे एक अतुट नाते तयार झाले आहे. वाढदिवसानिमित्त व कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात १५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. याबद्दल त्यांचे संदेश पारकर मित्रमंडळ व शिवसेनेच्यावतीने आभार मानले.

\