Monday, January 20, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकोरोना तपासणी लॅबचे नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण...

कोरोना तपासणी लॅबचे नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण…

पडवेत सुविधा; जिल्ह्यातील लोकांना होणारा फायदा…

ओरोस,ता.१४: सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजमध्ये शासकीय दरात कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने सर्व परवानग्या दिल्या असून कोरोना बाधित व निगेटिव्ह हे दोन्ही अहवाल मिळणार आहेत. ट्रुनॅट मशीनद्वारे ही तपासणी करण्यात येणार आहे. येथे कोरोना बाधित अहवाल आल्यास तो पुन्हा मोठ्या कोरोना तपासणी केंद्रात तपासणी करण्याची गरज नाही. यामुळे ज्याना कोरोना तपासणी करायची आहे. पण निकषामुळे शासकीय यंत्रणा ही तपासणी करु शकत नाही. त्यांना येथे सुविधा उपलब्ध झाली आहे. अवघ्या दीड तासात याचा अहवाल मिळणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव आ नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.
आ राणे यांच्या हस्ते फित कापून हॉस्पिटलमध्ये या सुविधेचा शुभारंभ झाला. यापूर्वी आ राणे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी हॉस्पिटलचे डीन डॉ आर एस कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा पडते, डॉ मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. जिल्ह्यात प्रथमच एखाद्या खाजगी दवाखान्यात अशाप्रकारे सुविधा उपलब्ध होत आहे. भाजप आमदारांनी दिलेल्या निधितून कोरोना तपासणीचे मोठे केंद्र लवकरच सुरु होत आहे. मात्र, आमची जिल्हा रुग्णालयाची स्पर्धा सुरु नाही. तर जिल्ह्यात अशाप्रकारे आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, असा आमचा प्रयत्न आहे, असेही यावेळी आ राणे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments