राजन तेली यांची केंद्रीयमंत्री नितीन गडकरीकडे मागणी…
कणकवली, ता.१४: महामार्ग ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे महामार्गावरून जाणार्या नागरिकांसह, वाहन चालक, प्रवाशांचेही जीव धोक्यात येण्याची शक्यता. त्यामुळे महामार्गाचा दर्जा तपासण्यासाठी केंद्रीय पथक पाठवावे अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींकडे केली आहे,
श्री.तेली यांनी म्हटले की, सिंधुदुर्गातील जानवली पूल ते झाराप हद्दीपर्यंतच्या महामार्गाचे चौपदरीकरण दिलीप बिल्डकॉन या कंपनीने केले आहे. मात्र या कंपनीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह आहे. कणकवली शहरात तर उड्डाणपूलाला जोडणार्या मुख्य रस्त्याची भिंत कोसळली आहे.
महामार्गावरील संरक्षक भिंती कोसळण्याचे प्रकार सुरू राहिल्यास वाहन चालकांसह नागरिकांचे जीव धोक्यात येणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने महामार्गाचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्यासाठी पथक पाठवावे. या पथकाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच चौपदरीकरणाचे उर्वरीत काम सुरू करावे असे श्री.तेली यांनी म्हटले आहे.