अतुल रावराणेंचा उपक्रम; शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन…
कणकवली ता.१५: वैभववाडी येथील भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांच्या माध्यमातून “बळीराजा आत्मसन्मान” उपक्रम राबवला जात आहे.या उपक्रमाचा शुभारंभ आज कणकवली येथे होणार आहे.यावेळी आ.वैभव नाईक,शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
हा उपक्रम कनेडी येथील समाधी पुरुष सभागृहात होणार आहे.शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम होत आहे.कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून काजू रोप वाटपाचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केले आहे.