उमेद अभियानाचे कर्मचारी..तीन महिने पगारा पासून वंचित..

424
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली.ता,१५: देशात सर्वत्र कोविड-19 मुळें परिस्थिती अत्यंत नाजूक होत चालली आहे.जगण-मरण हे सध्या कोरोना मुळं असाह्य झाले आहे.देशात २३ मार्च पासून लाॅकडाऊन घोषीत झाला आहे. खरं पण उमेद अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कामकाज मात्र सुरू आहे.महाराष्ट्र शासनाच्या या अभियानांतर्गत सिंधुदुर्गात ७० कर्मचारी काम करतात,गेले काही महिने हे कर्मचारी पगारापासून वंचित आहेत.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालय अंतर्गत सुरू असलेल्या गरिबी निर्मूलनच्या ग्रामविकास चळवळीचा भाग म्हणून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू आहे.अभियाना अंतर्गत संपुर्ण राज्यात महिला स्वयंसहाय्यता समुहाची बांधणी करुन महिला स्वयंसहाय्यता समुहाच्या माध्यमातून महिलांना उपजिवीका ची साधनं विकसीत करण्यासाठी प्रयत्न केले जातात. विविध स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्यात येतो.
एकीकडे गरिबी निर्मूलन हा महाराष्ट्र शासनाचा अजेंडा राबविण्यासाठी उमेद अभियान अंतर्गत जोरदार काम सुरू आहे. खरं,पण दुसरीकडे याच अभियान मध्ये गावपातळीवर ते राज्य पातळीवर काम करत असलेले अधिकारी कर्मचारी यांचा पगार गेली तिनं महिने अदा करण्यासाठी निधी उपलब्ध नाही, असे कारण दिले जात आहे. त्या मुळं गरिबी निर्मुलनासाठी काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. गेली तिन महिने बिनपगारी काम तेही कोरोना सारख्या महामारी मध्ये. एकही दिवस सुट्टी नाही.दररोज बैठक, आढावा, उध्दिष्ठ, कामकाज, ऑनलाईन प्रशिक्षण या सारख्या सर्व गोष्टी मुळे अधिकारी व कर्मचारी यांच्या मध्ये प्रचंड तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग ते जिल्हा पातळीपर्यंत कर्मचारी वेताना बाबतीत चौकशी केली असता निधी उपलब्ध नाही,असे उत्तर मिळते. सिंधुदुर्ग जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांनी तर सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील प्रवास देयक देखील निधी उपलब्ध नाही,म्हणून अदा केली नसल्याचे समोर आले आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनाने व उमेद राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व मंत्र्यांनी लक्ष घालावे व उमेद अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांच्यावर कोरोना काळात काम करुन देखील आलेल्या या उपासमारीवर वेळीच मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावा,अशी मागणी उमेद अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी करत आहेत.गरिबीच्या निर्मुलनासाठी काम करत असताना किमान कंत्राटी कर्मचारी यांना तरी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पगार वेळेवर दिला,तर या कोविड कालावधी मध्ये उपासमारीचे शिकार उमेद अभियान मधिल कर्मचारी अधिकारी होणार नाही,आशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

\