केतन आजगावकर ; मळगाव घाटीच्या प्रश्नाला केसरकरांनीच केराची टोपली दाखवली…
सावंतवाडी ता.१५: विक्रांत सावंत हे राजकारणातील “स्टंट बॉय” आहेत.त्यांनी मळगाव घाटाच्या संदर्भात आंदोलनाची भाषा करू नये,भाजपाच्या पदाधिकार्यांनी याबाबत आमदार केसरकर यांचे लक्ष वेधले होते.परंतु त्यांनी त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली.ही वस्तुस्थिती आहे,अशी टीका भाजपचे प्रवक्ते केतन आजगावकर यांनी आज येथे केली.दरम्यान आंदोलनाची भाषा करणाऱ्या श्री. सावंत यांनी केवळ नौटंकी करणे थांबवावे,घाट व खड्ड्यांची कामे पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे असते,सत्ताधारी पक्षात असताना ते आंदोलनाची भाषा करत आहे.हे दुर्दैव आहे,असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात म्हटल्याप्रमाणे, सकल मराठा समाजाचे बोट धरून राजकारणात सक्रीय झालेल्या विक्रांत सावंत यांनी प्रथम ग्रामीण भागातील जनतेची रेशन कार्ड,निराधार पेन्शन अशी कामे करावीत,त्यानंतर ग्रामपंचायत लढवावी,असाही सल्ला त्यांनी दिला आहे.ते खासदार विनायक राऊत यांच्या गळ्यातील ताईत आहेत,त्यामुळे त्यांना निधीची कमतरता भासणार नाही,आंदोलन करण्यासाठी आम्ही विरोधक सक्षम आहोत,असाही टोला त्यांनी लगावला आहे.