सागर नाणोसकर; आधी साधे शहर प्रमुख पद तरी मिळवून दाखवा….
सावंतवाडी,ता.१५: ज्यांना स्वतःच्या आयुष्यात साधे शहरप्रमुख पद सुद्धा मिळवता आले नाही, अशा लोकांनी केवळ नेत्यांची हुजरेगिरी करण्यासाठी विक्रांत सावंत यांच्यावर टीका करणे थांबवावे, असे प्रत्युत्तर युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी दिली.
ऑनलाइन धंद्यामुळे असलेला दबदबा आणि त्या माध्यमातून असलेले युवकांना प्रेरणा ही जगजाहीर आहे. त्यामुळे नेत्यांची हुजरेगिरी थांबून लोकांसाठी रस्त्यावर उतरावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे तालुकाप्रमुख केतन आजगावकर यांनी विक्रांत सावंत यांच्यावर राजकारणातील “स्टंट बाॅय” अशी टीका केली होती. याला श्री.नाणोसकर यांनी प्रत्युत्तर दिले.