कणकवलीतील “तो” कोसळलेला भाग पुन्हा करण्याच्या सुचना…

182
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कार्यकारी अभियंता; मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर…

सिंधुदुर्गनगरी,ता.१५: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सुरु असून, ते प्रगतीपथावर असल्याची माहिती रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागचे कार्यकारी अभियंता स.गु.शेख यांनी दिली.

चौपदरीकरणाचा भाग-10 मधील कलमठ ते झाराप कि.मी. 406/030 ते 450/170 (डिसाईन सा.क्र.237/655 ते 281/560) एकूण लांबी 43.905 कि.मी. आहे.  ही लांबी कणकवली  व कुडाळ मध्ये येत आहे. या लांबीच्या चौपदरीकणात मे. डी.बी.एल. कलमठ झाराप हायवेज प्रा. लि. या कंपनीकडून चौपदरीकरणाचे काम 9 फेब्रुवारी 2017 च्या करारनाम्यानुसार प्रगतीपथावर आहे.
या मंजूर कामानुसार एकूण 43.905 कि.मी. लांबीपैकी 40.29 कि.मी. लांबीच्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम नियुक्त केलेल्या कंत्राटदार कंपनीकडून पूर्ण करण्यात आले आहे. या चौपदरीकरणाच्या कामावर देखरेख करण्यासाठी मे. आर्टिफॅक्ट प्रोजक्ट लि. या कंपनीने स्वतंत्र अभियंताची नेमणूक केली असून,  या प्रकल्पाच्या नकाशांना मंजुरी देणे व त्याबरहुकूम काम करुन घेण्याची पूर्णत: जबाबदारी मे. आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट लि. या कंपनीच्या स्वतंत्र अभियंताची आहे.
कुडाळ शहरी भागातील लांबी व कणकवली शहरातील 43 गाळे असलेल्या 1260 मी. लांबीच्या फ्लायओव्हर व पोहच मार्ग वगळता उर्वरित 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. कणकवली येथील मुंबईच्या दिशेला 429 मी. व गोवाच्या दिशेला 255 मी. पोहच मार्गाचे काम व फ्यायओव्हरचे 15 गाळ्यांचे काम मार्च 2020 अखेर पूर्ण होणार होते. मात्र, कोविड-19 च्या महामारीमुळे हे काम करता आले नाही. अपूर्ण राहिलेल्या पोहच मार्गाच्या भरावामध्ये पावसाळ्यात पाणी जावून भरावाच्या दाबामुळे पोहच मार्गाच्या संरक्षक भितीचा 4.50 ते 2.00 मी. आकाराचा भाग 13 जुलै रोजी दुपारी 2 वाजता कोसळला असल्याचे दिसून आले. या पोहच मार्गाचे  काम पूर्णत: काढून नव्याने बांधकाम करण्याबाबत कंत्राटदाराच्या खर्चाने करण्याबाबतच्या लेखी सूचना देण्यात आल्या आहे. तसेच स्वतंत्र अभियंता यांनाही सूचित करण्यात आले आहे.
या चौपदरीकरणाच्या प्रकल्पाच्या बांधकामाची पुढील 15 वर्षे पूर्णत: कंत्राटदार मे. डी.बी.एल. कलमठ झाराप हायवेज प्रा.लि. यांची असून, त्यावरील देखरेखची जबाबदारी  स्वतंत्र अभियंता मे. आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट लि. यांची राहणार आहे.

\