आनारोजीन लोबोंचा सवाल;खासगी लोकांच्या हातात पालिकेची जागा देणार नाही….
सावंतवाडी,ता.१५: संजू परब नेमके कोणत्या खाजगी ठेकेदाराकडून सावंतवाडी शहरात प्रकल्प उभारत आहेत?, त्यामागे नेमका कोणाचा हात आहे?, नारायण राणे यांचा तर नव्हे ना?, असा सवाल आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो यांनी केला.
काही झाले तरी,आपण सावंतवाडी पालिकेची जागा खाजगी बिल्डरच्या घशात घालू देणार नाही. कंटेनर झाला नाही, त्यामुळे आता ते बेजबाबदार वक्तव्य करीत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी दिला.येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी आदी उपस्थित होते. यावेळी लोबो पुढे म्हणाल्या,