सिंधुदुर्गात एकूण २२९ जण कोरोना मुक्त

472
2
Google search engine
Google search engine
Google search engine

डॉ.धनंजय चाकूरकर ; सक्रीय रुग्णांची संख्या २९ वर

 सिंधुदुर्गनगरी.ता,१५: जिल्ह्यात आजपर्यंत २२९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २९ रुग्णांवर उपचार सुरू असून, नव्याने ६ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली वसाहत फोंडा येथील संपर्कात आलेले ४ रुग्ण,  कासार्डे येथील मुंबई येथून आलेला १ रुग्ण, तर मालवण तालुक्यातील वराड येथील मुंबई येथून आलेला १ रुग्ण असे नवीन ६ रुग्ण बाधीत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

\