…..त्यामुळेचं दीपक केसरकर वैफल्यग्रस्त…!

306
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राजन तेलींचा टोला; त्यांना शारीरिक नाही,तर राजकीय आजार…

मालवण ता.१५: शिवसेनेकडून वारंवार डावलण्यात येत असल्यामुळे आमदार दीपक केसरकर यांना राजकीय वैफल्य आले आहे,अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.दरम्यान केसरकर आजारी आहेत,असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात असले तरी,त्यांना शारीरिक नाही,तर राजकीय आजार झालेला आहे.त्यामुळे ते दूर आहेत,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.तेली पुढे म्हणाले, मागील चार ते साडेचार महिने केसरकर यांनी सावंतवाडी मतदार संघातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.याबाबत कोणी काही बोललं तर ते आजारी असल्याने मतदार संघात येत नाहीत,असे सांगण्यात येते.पण त्यांचा आजार नक्की कसला आहे.मुंबईतील काही बैठकांना ते उपस्थित असल्याचे दिसून येते,जिल्हा प्रशासनाच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये देखील ते सहभागी असतात. लत्यामुळे शिवसेनेने एकाकी पाडल्याने केसरकर जिल्ह्यात येत नसल्याचे तेली म्हणाले.

\