गणेशोत्सव काळात भजन करण्याची परवानगी द्यावी…

1505
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सांप्रदायिक भजनी संस्थेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी…

ओरोस ता १५
श्रीगणेश हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहे. हा अति महत्वाचा सण आहे. गणेशोत्सव काळात भजन नामस्मरणाला तेवढेच महत्व आहे. त्यामुळे या काळात भजन व आरती करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा सांप्रदायिक भजनी संस्था यांच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सांप्रदायिक भजनी संस्था जिल्हाध्यक्ष भालचंद्र केळूसकर, कणकवली अध्यक्ष प्रकाश पारकर आदिंसह मोठ्या संख्येने भजनी बुवा आले होते. मात्र, कोरोना पार्श्वभूमीवर मोजक्या व्यक्तिना प्रवेश देण्यात आला होता. यावेळी शशी राणे, संतोष मिराशी, गुंडू सावंत, ज्ञानदेव मेस्त्री, रवी कदम, उदय पारकर, मयूर ठाकूर, अतुल पारकर, गोपी लाड, अमोल पांचाळ आदी भजनी कलावंत उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलेल्यां निवेदनात ‘सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणुचे महाभयंकर संकट आहे. याची आम्हाला जाणीव आहे. जिल्ह्यातील अनेक भजनी बुवांनी भजनाच्या माध्यमातून कोरोनावर मात करण्यासाठी सोशल मीडिया माध्यमातून जनजागृती केली आहे. पूर्ण विश्वाचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेश चतुर्थी उत्सव कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. पूर्ण महाराष्ट्रात श्रीगणेश व परमेश्वराचे भजन नामस्मरणला अतिमहत्व आहे. भजनाची परंपरा आपल्या परशुरामाच्या भूमी असलेल्या कोकणात भावनिकतेची आहे. त्यामुळे या निवेदनाद्वारे नियमाच्या अधीन राहून आम्हाला भगवंताचे भजन व आरती करण्यास शासनाने परवानगी द्यावी,’ अशी मागणी करीत असल्याचे म्हटले आहे.

प्रतिक्रिया
गणेशोत्सव काळात भजन बंद झाल्यास भजनी मंडळ व भजनी बुवांसोबत वाद्य बनविणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. भजनात लागणाऱ्या पखवाज, तबला, हार्मोनियम बनविणारे अथवा दुरुस्ती करणारे कारागीर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे शासनाच्या अटी नियमांचे पालन करून भजन करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांनी केली आहे, अशी प्रतिक्रिया कणकवली अध्यक्ष प्रकाश पारकर यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

\