वेंगुर्ल्यात आज पासून प्रारंभ होणार रानभाजी विक्रीकेंद्र…

264
2
Google search engine
Google search engine
Google search engine

‘माझा वेंगुर्ला‘चा ‘उत्सव रानभाज्यांचा‘ अंतर्गत उपक्रम..

वेंगुर्ला,ता.१५: ‘माझा वेंगुर्ला‘तर्फे ‘उत्सव रानभाज्यांचा‘ अंतर्गत दि. १५ जुलैपासून ‘प्रदर्शनात्मक रानभाजी आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृती विक्रीकेंद्र‘ सकाळी ९ ते १ व सायंकाळी ५.३० पासून पुढे या वेळेत सुरु करण्यात आले आहे.
पावसाच्या आगमनासोबत खवय्यांना उत्सुकता असते आपल्या कोकणच्या रानावनात उगवणाऱ्या अनेक दुर्मिळ, औषधी आणि रानमोळी चवदार रानभाज्यांची. याच अल्पपरिचित रानभाज्यांचे औषधी महत्व, उपयोग आणि त्यापासून बनवता येणाऱ्या चवदार पाककृती यांची माहिती युवा पिढीला होण्यासाठी ‘माझा वेंगुर्ला‘ तर्फे या उपक्रमाचे आयोजन केले आहे. सदरचे विक्रीकेंद्र वेंगुर्ला बाजारपेठ, नगरपरिषदेसमोर सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी रानभाज्या उपलब्धतेनुसार ग्राहकांना दिल्या जातील. तरी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ‘माझा वेंगुर्ला‘ तर्फे केले आहे.

\