सावंतवाडीतील महिला महाविद्यालयात प्रवेश प्रक्रीया सुरू…

412
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संतोष सावंत; बॅचलर इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लीकेशन अभ्यासक्रमाचा समावेश…

सावंतवाडी,ता.१६: जिल्ह्यातील पहिल्या येथील महिला संगणक महाविद्यालयात बॅचलर इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संतोष सावंत यांनी केले आहे.या शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर संबधित विद्यार्थिनींना अ‍ॅप्लिकेशन प्रोग्राम, वेब डिझायनिंग, कॉम्प्युटर प्रोग्राम, डेटाबेेस अ‍ॅडमिनीस्ट्रेशन आदी कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रवेश घेणार्‍या विदयार्थीनींना शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक कर्जाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रशालेच्या माध्यमातून सुसज्ज लॅब, लायब्ररी आदीच्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचा फायदा विद्यार्थ्यानी घ्यावा, आणि अधिक माहितीसाठी मुख्याध्यापक स्वप्नील गडकरी (०२३६३ २७११२० / ९४०३५५९९५३ / ९५६१२५५९३२) यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन श्री.सावंत यांनी केले आहे.

\