कणकवली,ता१६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने सलग नवव्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक राखला आहे. यंदा बारावीचा निकाल 96.57 टक्के एवढा सर्वाधिक लागला आहे. तर जिल्ह्यातील 30 कनिष्ठ महाविद्यालयांनी 100 टक्के निकाल लावून गुणवत्ता सिद्ध केली आहे.
सिंधुदुर्गातील 8 जिल्ह्यांतील 91 महाविद्यालयातून 10556 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नावनोंदणी केली होती. तर प्रत्यक्षात 10536 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 10175 उत्तीर्ण झाले. यात विशेष प्रावीण्य श्रेणीत 926, प्रथम श्रेणीत 4721, द्वितीय श्रेणीत 4318 आणि पास श्रेणीत 210 विद्यार्थी आहेत. सिंधुदुर्गातील विज्ञान शाखेचा एकूण निकाल 99.53 टक्के लागला. तर कला शाखा 89.70 टक्के, वाणिज्य शाखा 98.89 टक्के व व्यावसायिक विषयांचा निकाल 94.83 टक्के लागला आहे.
दरम्यान सिंधुदुर्गातील तालुकानिहाय निकालामध्ये वैभववाडी 98.69 टक्के प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर दोडामार्ग 97.90 टक्के, कुडाळ 96.83 टक्के, कणकवली 96.88 टक्के, सावंतवाडी 96.74 टक्के,
मालवण 96.36 टक्के, वेगुर्ले 96.01 टक्के, देवगड 94.67 टक्के अशी क्रमवारी आहे.