Friday, April 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावैभववाडी तालुक्याचा बारावीचा ९८.४६ टक्के निकाल...

वैभववाडी तालुक्याचा बारावीचा ९८.४६ टक्के निकाल…

कै. हेमंत केशव रावराणे महाविद्यालयाची विद्यार्थिनी तालुक्यात प्रथम…

वैभववाडी/पंकज मोरे ता.१६:महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा वैभववाडी तालुक्याचा ९८.४६ टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील सहा ज्युनिअर काॕलेजमधून एकूण ५११ विदयार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी ५०७ विदयार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यात कै. हेमंत केशव रावराणे विद्यालयाची कु. प्रफुल्ली प्रभाकर दळवी(८६.४६) टक्के गुण मिळवत प्रथम आली आहे. तर याच विद्यालयाची प्राची प्रशांत रावराणे ८५.८४ टक्के गुण मिळवित व्दितीय तर माधवराव पवार कोकीसरे विद्यालयाची कु. भाग्यश्री रत्नाकर आम्रसकर(८४.७७) टक्के गुण मिळवित तृतिय आली आहे. याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. निकालात कोकणची परंपरा कायम राहिली आहे.

_तालुक्यातील काॕलेजचा निकाल खालीलप्रमाणे-_

कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ विदयालय वैभववाडी काॕलेजचा विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण परीक्षेला ६५ विद्यार्थी बसले होते. सर्व उत्तीर्ण झाले आहेत. विदयालयातून कु. सुरेंद्र गणपत लाड(७४.) टक्के गुण मिळवित प्रथम आला आहे तर कु. आकांक्षा भगवान सावंत(६३.८४) टक्के गुण मिळवत व्दितीय आली. कु. सोनाली विजय तांबे(५७.५९) टक्के गुण मिळवित तृतिय आली.
कला शाखेतून ६३ विदयार्थी परीक्षेत बसले होते. सर्व र्विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाखेचा १०० टक्के निकाल लागला. शाखेतून कु. शुभदा यशवंत पुजारी(७६.३०) टक्के गुण मिळवत प्रथम तर श्रमिका काशिराम सोगम(६५.८४) टक्के गुण मिळवत व्दितीय, सुदेश संतोष निकम(६४.६१) टक्के गुण मिळवत तृतिया आला आहे.
वाणिज्य शाखेतून ११८ विदयार्थी परीक्षेस बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाखेतून कु. प्रफुल्ली प्रभाकर दळवी(८६.४६) टक्के गुणा मिळवित प्रथम आली आहे तर कु. प्राची प्रशांत रावराणे(८५.८४) टक्के गुण मिळवित द्दितिय, तर अक्षता सचिन तावडे(७९.२३) टक्के गुण मिळवित तृतिय क्रमांक पटकाविला आहे.
तात्यासो मोरे कनिष्ठ महाविदयालय भुईबावडा विदयालय कला शाखेतून २३ विदयार्थ्यांपैकी २१ विदयार्थी उत्तीर्ण झाले. शाखेचा ९१.३० टक्के निकाल लागला आहे. शाखेतून अनुक्रमे कु. प्रांजली प्रदिप शिंदे(७४.७७) गुण मिळवित प्रथथ आली आहे तर व्दितीय आशिष अरविंद मोरे(६९.५४)टक्के , कु. संजना संतोष गुरव(६३.५४) टक्के गुण मिळवीत तृतिय क्रमांक मिळविला आहे.
तर वाणिज्य शाखेतून १५ विदयार्थी परिक्षेस बसले होते. त्यापैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाखेचा ९३.३३ टक्के निकाल लागला. शाखेतून अनुक्रमे कु. श्रद्धा संतोष गवळी(७१.०८) टक्के गुण मिळवित प्रथम आली आहे तर कु. दिव्या गजानन सावंत(७०.९२) टक्के गुण मिळवित व्दितीय, कु. किशोरी रघुनाथ नारकर(६९.२३) टक्के गुण मिळवित तृतिय आली आहे.
छत्रपती शिवाजी कनिष्ठ विदयालय नेर्ले कला शाखेतून एकूण ३६ विदयार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी ३५ विदयार्थी उत्तीर्ण झाले. शाखेचा निकाल ९७.२२टक्के लागला आहे. तर कला शाखेतून प्रथम कु. शर्मिला दिपक पांचाळ(७०.४६) टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर कु. निकीता रत्नु धावडे(६६.) टक्के गुण मिळवित व्दितीय, पुजांका प्रभाकर गुरव(६२.९२) टक्के गुण मिळवित तृतिय आली आहे.
तर वाणिज्य शाखेतून २४ विदयार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे. शाखेतून कु. भूषण विलास पांचाळ(७२.) टक्के गुण मिळवित प्रथम आला आहे तर कु. प्रतिक प्रकाश घागरे(७१.८४) टक्के गुण मिळवित व्दितीय आला आहे. तर कु. अश्विनी अनंत पालांडे(७१.०७) टक्के गुण मिळवित तृतिय क्रमांक पटकाविला आहे.
आचिर्णे कनिष्ठ महाविदयाल विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण ६२ विदयार्थी परिक्षेस बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाखेतून अनुक्रमे कु. सुकन्या प्रकाश सावंत(७०.७७) टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर कु. आदिती दिपक पाटील(६७.५४) टक्के गुण मिळवित व्दितीय, प्रतिक मोहन कांबळे(६६.४६) टक्के गुण मिळवित तृतिय आला आहे.
वाणिज्य शाखेतून ३९ विद्यार्थी बसले होते. सर्व विदयार्थी उत्तीर्ण झाले. शाखेचा १०० टक्के निकाल लागला. प्रथम तीन क्रमांकाने कु. प्रणिती प्रकाश मिराशी(८३.७३) टक्के गुण मिळवित प्रथम तर कु. प्रथमेश प्रकाश गुरव(७९.०७) टक्के गुण मिळवित व्दितीय, कु. सृष्टी सुरेश जाधव(७७.०७) टक्के गुण मिळवित तृतिय आली आहे.
माधवराव पवार कनिष्ठ महाविदयालय कोकिसरेचा १०० टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेतून ५२ विदयार्थी परिक्षेस बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु. भाग्यश्री रत्नाकर आम्रसकर(८४.७७) टक्के गुण मिळवित प्रथम आली आहे तर कु. ऋतुजा चंद्रकांत करंबळे(८२.७७) टक्के गुण मिळवित व्दितीय, कु. पूनम रविंद्र आयरे(८२.१५) टक्के गुण मिळवित तृतिय आली आहे.
कै.हरिश्चंद्र साळुंखे पाटील ज्यु.काॕलेजचा कला, वाणिज्य व विज्ञान शाखा या तिन्ही शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments