डॉ.धनंजय चाकूरकर; जिल्ह्यात २५ सक्रीय रुग्ण…
सिंधुदुर्गनगरी ता.१६: जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २३४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
अ.क्र विषय संख्या
1 तपासण्यात आलेले एकूण नमुने 4,535
2 अहवाल प्राप्त झालेले नमुने 4,494
3 आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 265
4 निगेटीव्ह आलेले नमुने 4,229
5 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 41
6 सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 25
7 इतर जिल्हे व इतर राज्यातील रुग्ण 1 (मुंबई)
8 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
9 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 234
10 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 52
बाधीत संशयित
अ डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल 15 27
ब डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर 3 0
क कोवीड केअर सेंटर 7 0
11 आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 4,142
12 संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती 12,601
अ शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 49
ब गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 9,757
क नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 2,795
13 दि. 2 मे 2020 रोजी पासून आतापर्यंत जिल्ह्यात आलेल्या व्यक्ती 135,424
जिल्ह्यात कोवीड – 19 विषयी टास्क फोर्सची निर्मिती
कोविड – 19 आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावास आळा घालण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या नियंत्रणाखाली आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. कोविड – 19 या आजाराने त्रस्त असलेल्या गंभीर व अतिगंभीर रुग्णांच्या बाबतीत रुग्ण व्यवस्थापन संहिता, योग्य औषधोपचार, कोविड रुग्णालयात विशेषज्ञ डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ यांची आवश्यकता सुनिश्चित करणे, याबाबत उपाययोजना निश्चित करणे व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्याची अंमलबजावणी करणे यासाठी टास्ट फोर्स काम करणार आहे.
या टास्क फोर्समध्ये शासकीय तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचा समावेश आहे. टास्क फोर्समध्ये समावेश असलेल्या डॉक्टर्सची नावे पुढील प्रमाणे आहेत. डॉ. शंतनू तेंडोलकर, एम.डी. मेडीसीन, डॉ. वादीराज सवदत्ती, एम.डी. ॲनेस्थेशीया, डॉ. बी.जी. शेळके, एम.डी. चेस्ट व टीबी, डॉ. सोनल घोगळ, एम.डी. मायक्रोबायोलॉजी, डॉ. मेहेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिक्षक, जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉ. विवेक रेडकर, एम.डी. मेडीसीन यांचा समावेश आहे.