नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत,तो पर्यंत घळभरणी होऊ देणार नाही…

402
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नितेश राणे; पाटबंधारे धरण प्रकल्पाच्या बंधाऱ्याची केली पाहणी…

कणकवली, ता.१६ : नरडवे धरण प्रकल्पात प्रत्येक टप्प्यातील काम दर्जेदार झाले पाहिजे. कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही,शेवट्च्या प्रकल्पग्रस्ताला न्याय मिळत नाही तो पर्यंत प्रकल्पाच्या घळभरणीचे काम होऊ देणार नाही,असा इशारा आम.नितेश राणे यांनी दिला.
नरडवे मध्यम पाटबंधारे धरण प्रकल्पाच्या बंधाऱ्याची माती वाहून गेली होती.त्या कामाची पाहणी आम.नितेश राणे यांनी आज केली.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,जिप माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, सौ.संजना सावंत,नरडवे सरपंच सौ.अनिता सावंत,उपसरपंच सुरेश ढवण,प्रकल्प कमिटी अध्यक्ष सदा सावंत,अवि गुरुजी,संजय पवार,अरविंद पवार,सोसायटी चेअरमन बाबू सावंत,प्रकल्पाचे उपअभियंता मकरंद म्याकल,श्री.चौगुले याच्या सह गावातील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देतानांच ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले.त्याचे प्रश्न अधिकाऱ्यांना आपल्या नेहमीच्या शैलीत समजावून देत ते किती दिवसात सोडविणार यांची हमी सुद्धा आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.
कोणत्याही चुकीला माफी नाही.त्यामुळे जर चुकीचे काम होत असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे.मात्र धरणाच्या कामावरून कोण राजकारण करत असेल तर तेसुद्धा चुकीचे आहे. आजपर्यंत माजी मुख्यमंत्री खासदार राणे साहेब यांच्या माध्यमातून नरडवे प्रकल्पग्रस्थानचे प्रश्न सोडविले आहेत.या पुढेही येथील प्रत्येक प्रश्न सोडवून जनतेला न्याय मिळवून देणार.कोनावरही अन्याय होऊ देणार नाही.असे आम.नितेश राणे यांनी सांगितले.

\