शिरोडा येथील बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९८.१४ टक्के…

658
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.१६: शिरोडा येथील बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालयाचा यावर्षी बारावीचा निकाल ९८.१४% एवढा लागला असून,एकूण प्रविष्ठ ३२३ पैकी ३१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाविद्यालयाचा शाखानिहाय निकाल पुढील प्रमाणे:-
विज्ञान शाखेतून १०६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.पैकी सर्व विद्यार्थी पास झाले असून शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.यात सुरज विजय गावडे याने ७८.४६% गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.तर द्वितीय-इंद्रायणी नारायण मोर्जे ७७.८४%, जानवी सुनिल परब ७७.८४, निकिता दिलीप गिरप ७७.८४ ,तर तृतीय चिन्मय नितीन परब ७६.७६%
वाणिज्य शाखेतून एकूण ९१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते,पैकी सर्व विद्यार्थी पास झाले असून शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.यात प्रथम- दिव्या प्रदीप काकतकर ९०.९२%, द्वितीय- मनाली पांडुरंग दळवी ८४%, तर तृतीय पांडुरंग देवेंद्र शिरसाट ८३.२३%
कला शाखेतून एकूण ४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते .पैकी सर्व विद्यार्थी पास झाले असून शाखेचा निकाल १००% लागला आहे.यात प्रथम- मीरा चंद्रकांत मामलेकर ८०% द्वितीय-पूजा दुर्गानंद दळवी ७९.२३% तर तृतीय-संजना नंदू पालकर ६९.५३%
होकेशनल शाखेतून ८१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते,पैकी ७५ विद्यार्थी पास झाले असून,शाखेचा निकाल ९२.५९ % एवढ्या लागला आहे. यात प्रथम-रघुराज सदानंद टेमकर ७८.६१ द्वितीय -जयेश भुजंग सावंत ७८.१५ तर तृतीय-प्राची रामचंद्र साळगावकर ७४.६१%

\